Monday, October 10, 2011

माणसाने मनमोकळे जगावे

म्हणतात, माणसाने मनमोकळे जगावे, समस्या काय प्रत्येकाच्या जीवनात असतात, आणि तो प्रत्येकजण समस्येला आपले म्हणत त्यावर मात करत असतो...
म्हणतात, उगाच माणसाने दुसरयाची चिंता करू नये, तो दुसरा समर्थ असतो पेलायला अनेक संकटे...
म्हणतात, फुकटची काळजी दाखवू नका, जसे काही ती काळजी ही नुसता दिखावा आहे आणि शुष्क वाळवंटात मृगजळ दाखवून तहानेला अधिक तीव्र करणे आहे..
. . . . . . . . . . . .. . . .
जगापासून कितीही अलिप्त राहावे म्हणाले तरी आपण ह्या जगाचा एक भागच असतो, हे विसरतो आणि स्वतःच्या कल्पनेला प्रतिक मानून जगतो.. सगळ्या लोकांना दूर सारून...
आणि अशा माणसांना काय बोलावे मला नाही कळत... जेव्हा ती खासकरून जवळची असतात.

No comments:

Post a Comment