Friday, October 14, 2011

आज कुठे मी हरविलो आहे...*

आज जगायचे आहे मला...
तुझ्या आठवणींना जागवत...
तूझ्या विना जगून बघतो...
तुझ्या आठवणींना आठवत...


आज कुठे मी हरविलो आहे...*

वास्तवात असूनही आज
मन स्वप्नं गुंफित आहे,
न जाणे वेड्या मनासवे
न जाणे आज मी कुठे हरविलो आहे...

शब्दांचा अर्थ शोधतांना
शब्दच आज विरत आहे,
बेलगाम मनाला आवरता
न जाणे आज मी कुठे हरविलो आहे...

ग्रीष्मातल्या प्रहरी
आज मेघ बरसत आहे,
मन चिंब भिजले असतांना
न जाणे आज मी कुठे हरविलो आहे...

आज वाटाड्या वाटेला
वाट दाखवीत आहे,
मनाला मार्ग दाखवीतांना
न जाणे आज मी कुठे हरविलो आहे...

उत्तरालाही आज प्रश्नांनी
ग्रासून सोडलं आहे,
मनाचे प्रश्नचिन्ह सोडवितांना
न जाणे आज मी कुठे हरविलो आहे...

मेघाचा पहिला पाऊस
धरणीची तहान भागवित आहे,
मनाची तहान शमावितांना
न जाणे आज मी कुठे हरविलो आहे...

दिशाही तूच,ध्यासही तूच माझ्या
प्रत्येक शब्दात तुझेच अस्तित्व आहे,
कदाचित तुलाही असच वाटत असेल
" न जाणे आज मी कुठे हरविलो आहे..."

No comments:

Post a Comment