फक्त दे तू हात
माझ्या या हातात
राहो दिनरात
साथ तूझी ||
मिळूनिया पाहू
स्वप्न हे उद्याचे
गुज काळजाचे
ऐक सखे ||
दमलो सखे गं
धावूनिया मागे
जोड आता धागे
मनाशी या ||
कळेल तुलाही
वेदना मनाची
तुला या प्रेमाची
आण असे ||
आज मज वाटे
यावे तुझ्या पास
मिळे सहवास
आनंदाचा ||
विनवणी हेची
एक असे आता
फक्त दे तू हाता
हातात या ||
No comments:
Post a Comment