किती सहायचे तडाखे अजून
आणि कसं ते सांगा
दार उघडल नशीब म्हणून
अजून तटायचं किती सांगा !
रांगाच्या रांगा लागल्यात तिथं
पण कसल्या ते सांगा
राहू का मीही उभा त्यात
पण काय गवसेल सांगा !
चालून चालून चपला तुटल्या
थांबायचं कुठं सांगा
घाम नितळून पाणी आटलं
राबायचं किती सांगा !
सूर्या येतो रोजच त्याला
काळजी कसली सांगा .
सणाला पोरं वाट बघत्यात
त्यांना काय सांगू सांगा !
रेषा हातावरच्या म्हणत्यात आता
आमचंच नशीब सांगा ,
त्याच असं म्हणाल्या तर
गरिबांनी जगायचं कसं सांगा !
No comments:
Post a Comment