Friday, October 14, 2011

क्षणाचाही विलंब न करता मी बोलून टाकले,

क्षणाचाही विलंब न करता मी बोलून टाकले,
काळजात धकधक होतीच...तरीही...
तशी ती शांतच होती... मला वाटणारे भय त्यामुळे थोडेसे शिथिल झाले...
एकीकडे मन मोकळे केल्याचे सुख तर एकीकडे पुढे काय हा प्रश्न...
तिच्यामधून स्वतःला दूर करायचे असे स्वतःला सतत समजावयाचे....
आणि तिच्याबरोबर असताना, बोलताना आणि नसतानाही तिच्यातच गुंतून पडायचे...
कदाचित ह्यालाच प्रेमाची करून सीमा म्हणतात, कदाचित.. बावरा मन समझ न पाये, प्रेम कि आहट गीत में गुनगुनाये...
ऐसे मोहे राधे कि प्यास, कैसे बुझाऊ मेरे श्याम रे....



हृदयाचा ठोका चुकतो
मनात एक भाव दाटतो
हळूच गालात हसतो
तेच भाव शब्दात मांडतो



चंद्र हि माझ्यावर रागवतो
का तुझ्या सख्येला माझी उपमा देतो
गुपित हे आज माझे मांडतो
तुझ्या पियेला पाहून आजकाल मी हि कविता करतो

No comments:

Post a Comment