Friday, October 14, 2011

आभाळाच्या दारावर एकदा टक टक कुणीतरी केली

आभाळाच्या दारावर एकदा
टक टक कुणीतरी केली
दार उघडून पाहिलं
तेंव्हा दारात फुलं
त्याने पाहिली.

पांढरी शुभ्र फुलं सगळी
का गोळा झाली ?
काय काम असेल त्यांचं
म्हणून वर्षाही आली .
फुलं म्हणाली मग त्याला ,..
रंग पेरून तुम्ही देवांनी
सृष्टी केलीय हिरवी ;
का मग आम्ही फुलेच
राहू फक्त पांढरी?

विचार थोडा करून मग
वर्षा त्यांना बोलली ,
जाऊन झोपा आता तुमची
इच्छा होईल पुरी !
पण ठेवा लक्षात, उद्या
पहाटे रंग येतील दारी;
रंगतील रंगात तीच फुले
जागी असतील जी कुणी.
राहतील तशीच पांढरी जी
ऐकणार नाहीत कुणी !

पटून म्हणण तिचं सारी
फुल गेली झोपून
उठायचय पहाटे रंगासाठी
हे मनाशी ठरवून .
एवढ ठरवून मनी सुद्धा
कांही राहिली झोपून
उठून पाहिलं त्यांनी तेंव्हा
कांही रंगात बसली होती नटून.

कळली त्यांना चूक त्यांची
पण वेळ गेली निघून
म्हणूनच मोगरा ,जाई-जुई
राहिल्या पांढरयाच रंगाला पांघरून !!!!!!!!

No comments:

Post a Comment