तू न्हवतास जवळ तेंव्हा
सोबतीला माझ्या आभाळ होतं
भरलेलं असलं म्हणून
काय झालं ,
आपलं त्यात गाव होतं !
तू न्हवतास जवळ तेंव्हा
मनात तयार घर होतं
रिकामंअसलं म्हणून
काय झालं ,
त्यावर तुझंच तर नाव होतं !
तू न्हवतास जवळ तेंव्हा
डोळ्यात एक स्वप्न होतं
पुसट असलं म्हणून
काय झालं,
ते तुझंच तर चित्र होतं !
तू न्हवतास जवळ तेंव्हा
जवळ एक गीत होतं
समजत नसलं म्हणून
काय झालं ,
ते तुझ्यासाठीच तर गात होतं !
तू न्हवतास जवळ तेंव्हा
रात्रीला एक भय होतं ,
पौर्णिमा असली म्हणून
काय झालं ,
चांदणं तर.. चंद्राजवळ होतं !
No comments:
Post a Comment