Sunday, October 30, 2011

तुझ्या सहवासात माझा रात्रीचा दिवस होतो

सहवास
तुझ्या सहवासात माझा
रात्रीचा दिवस होतो
माझ्या मनी तव प्रेमाचा
गुलमोहर फुलतो

नुसत्या तुझ्या आठवणीनही
जीव माझा मोहरतो
तुझ्या सहवासाची मग
मी स्वप्ने पाहू लागतो

दोन घडीचा तुझा
सहवासही मला पुरेसा होतो
तुझ्या आठवणींचा नंदादीप
मग माझ्या मनी तेवत राहतो

कधी तू येतेस
कधी तुझी स्वप्ने येतात
स्वप्नातही मला तुझ्या
सहवासाची जाणीव देतात

तुझं येण माझ्यासाठी
नवजीवन घेऊन येतं
रात्रीच चांदणही मग
रुपेरी लेनं लेऊन येतं

तुझ्या मिठीतील सहवासाची
ओढ मला लागते
चांदण्याची रात्रही मग
आपल्यासावे जागते

तू जातेस प्रीतीचा
ओळ सुगंध ठेऊन
दिवस माझाही जातो मग
आठवणींना तुझ्या घेऊन ......................................

No comments:

Post a Comment