Wednesday, October 19, 2011

वेळ गेली निघून

वेळ गेली निघून
============
जगणे आयुष्याचे
हसणे रडणे क्षणिक असे
जरी उरी दाटे हुंदका
तरी ओठान वर स्मित बसे
फक्त अश्रूंची वाट नको
म्हणून गपली
पण का तिथेच
शब्दांची शृंखला संपली
हसऱ्या डोळ्यात हि
पहिले दुखाचे सागर
कसे हे जीवनाचे
अदभूत भवसागर
नाते जुडतात तुटतात
तोडणाऱ्याला त्रास नाही
पण तुटलेल्याचा हृदयाला
छन्नी करत तडा जाईल
मग का म्हणून असे
मातीचे मन असावे
बसरले पापण्या तर वाहणारे
ठेच लागली तर फुटणारे
पण काही हि असो कसा हि असो
प्रत्येक क्षण खोलात जपणारे
आठवांचा शहारा
क्षणो क्षणी जाणवणारे
फक्त हसताना बघायला
खोटा मुखवटा चढवला
पण नजरेने केली बैमानी
परत डोळ्याच्या कोपऱ्यातून
मनाचे भाव बोलला
खोटी नाटक हसण्याची
देखावा सुखाचा
कळत नाही का इतकं हि
कशाला पुरावा धोक्याचा
अंजन घातले डोळ्यात
तरीहि दिसणार नाय
जे आता पर्यंत कळले नाही
आता कळून उपयोग तरी काय....
वेळ गेली निघून............

No comments:

Post a Comment