गेलेल्या पावलांनी सांग ना
परत येशील का
सुटलेला संग पुन्हा
जोडशील का ?
आजही तुझीच
वाट मी पाहत्ये
तुझ्या एका हाकेसाठी
आजही धावत्ये .........
सोबतीसाठी तुजीया
मन हे असुसलय
दुरावले म्हणून हृदय आता
मजवरच रुसलय .........
तासनतास ते तुझ बोलन
आवडते तुज म्हणून
मज ते छळण
उगाच क्षणिक ते भांडण
आवडतोस मज त्यातूनच
आडवाटेन ते सांगण .............
कळायचं तरीही ते विचारण
संग न ग करतेस का प्रेम मजवर ?
पण प्रत्येकवेळी माझ ते
हसण्यावर नेण......
आग्रह तुझा ठरौयात कि भेटन
माझ मात्र दरवेळीच टाळण
पुन्हा ते क्षण
हवेसे वाटतात
आठवणींचे ढग
पुन्हा पुन्हा दाटतात
संग न हरवलेत हे सारे क्षण कुठे
हसणेही सारे आता वाटतय खोटे
आजही बोलतो पण त्यात
फक्त औपचारिकता असते
दोहोंमध्ये एक खोल दरी भासते
सांग ना परत तू येशील का ?
तेच प्रेम मजवर करशील का ?
पुन्हा तोच प्रश्न विचारशील का ?
सांग ना न बोलता
होकार माझा ऐकशील का ?
सांग ना ......................
No comments:
Post a Comment