खूप दाटून आलाय
गडगडतय..
नक्की त्याच्या मनात
काय बरे सलतंय..?
ती खेळत आहे
त्याच्या अंगावर
वेदनेचा प्रकाश
त्याच्या मनावर...
तो तरी तिला
आपले म्हणतो
पोळून निघाला तरी
गडगडत राहतो...
ती येते आणि जाते
हा भरून येतो
ती लख्खं हसते
हा बेधुंद बरसतो....
रिकामा होत जातो
मातीत मिसळतो
वाहत जातो परत तिथेच
पुन्हा नव्याने बरसतो...
No comments:
Post a Comment