Friday, October 14, 2011

वजा केले आयुष्य माझे

वजा केले आयुष्य माझे
सुख दिसणार नाही
मांडलेच दुःख माझे
बाकी उरणार नाही...


चारोलीतच मज भाव
मनाचे मांडता येतात
त्यापुढे जाताच ते
शब्दही आपसूक अडतात



भग्न अवस्थेत मी वावरतोय
नग्न समाजाची प्रथा राबवतोय
सर्व काही कळून हि
बस बघ्याची भूमिका बजावतोय

No comments:

Post a Comment