Sunday, October 30, 2011

टाळले साऱ्या दिशांनी

टाळले साऱ्या दिशांनी
टाळले साऱ्या दिशांनी
जाऊ कुठे हे भगवन?

दाटला अंधार सारा
पाहू कुठे हे भगवन ?

वेधले दु:खानी इतुके
साहू किती हे भगवन ?

कुठे दिसेना ठाव तुझा
धावू किती हे भगवन?

दाही दिशा दूर गेल्या
राहू कुठे हे भगवन ?

दाखव रे मार्ग तूच आता
तुजविण कोण भगवन ?

No comments:

Post a Comment