Friday, October 14, 2011

जन्म माझा कशासाठी याचा अर्थ अजून हि गुपित

वेदनेला कस कळतं
कुणासाठी ठसायचय?
का तिलाही असं वाटतं
आठवण जपायचीय!



जन्म माझा कशासाठी
याचा अर्थ अजून हि गुपित
भोतिक सुखात रमलेला
असा मी एक शापित



जगाव तर ......किती प्रश्नांनी उभा रहाव ??
ताठ मानेने जगाव कि मान झुकवूनी रहाव
ताठ मानेने जगाव तर समाजाच्या विरोधात जाव
मान झुकून जगाव तर समाजाच्या ताटा खालच मांजर व्हाव

एक प्रश्न सुटाव तर .... दुसऱ्या प्रश्नाने का म्हणून उठाव
विरोध पत्करून जगाव कि विरोध करत जगाव
विरोध पत्करून जगाव तर समाजाच्या मनात भराव
विरोध करत जगाव तर स्वताच्याच मनातून उतरावं

प्रश्नांनी प्रश्न बनूनच का रहाव .....कधी तरी हे प्रश्न सुटाव
प्रश्न सोडवावं कि प्रश्नांना तसच राहून द्याव
प्रश्नांना सोडवावं तर दुसऱ्या प्रश्नाची निर्मित व्हाव
प्रश्नांना तसच राहून द्याव तर आपणच आपली असमर्थतता दर्शाव

का मी असा विचार कराव .... सार काही नशीब वर सोडाव ?
नशिबावर सोडाव तर .. आपणच हीन ठराव
नशिबास उत्तर द्याव .... आपल नशीब दीन ठराव

No comments:

Post a Comment