Sunday, October 30, 2011

प्रत्येक शब्द तुझ्यासाठी.... शांतपणे लिहिलेला....

प्रत्येक शब्द तुझ्यासाठी....
शांतपणे लिहिलेला....
तरी का असा तो....
तुझ्याच साठी अडलेला...



जेवताना ताटात
एक घास होता उरला.
टाकून उठणार इतक्यात
तो चेहरा आठवला इवला .

प्लेट घेऊन सकाळीच
तो उपाशीच होता आला .
म्हणाला ,... माय...
भाकर दे ग मला ..
कालपासून जीव बघ
वाराच नुसता खाल्ला ......
टीचभर पोट माझं,
पण भरत नाही खळगा....
काम मागितलं कुणाला तर
म्हणत्यात ..पुढल्या दाराला जावा!
कसं सांग माये तू ,राहू मी उभा?
रस्त्याच्या पल्याड वाट बघतोय ,
हात पाय जोडून .... माझा बाबा !
एक घास दे माये ,
पुरवू अर्धा -अर्धा ..
तुझी पिल्लं जेऊन झाली कि
पुसून घेईन त्यांचा डब्बा .......
.............आठवून आलं पाणी
जीव केवढा तो बघा .....
उठून देऊन आले 'पल्याड '
भाकरीचा तो डब्बा !!!!!!!

No comments:

Post a Comment