Sunday, October 30, 2011

तुम्हाला काय वाटलं ,मी काय प्याली असेन?

तुम्हाला काय वाटलं ,मी काय प्याली असेन?
ज्याची मला इतकी ही नशा चढली असेल ?

सत्तेचं सरबत पिवून मी
तब्बेत सांभाळली असेल ?
कि खुर्चीची उब घेऊन
मी 'अंडी 'उबवली असेन?
तुम्हाला काय वाटतं मी ,काय प्याली असेन?

माझ्याजवळचा पैसा मी
'स्विस ' केला असेन?कि
छताचं पोट फाडून त्यात
त्याला 'लॉक 'केला असेन ?
तुम्हाला काय वाटतं मी ,काय प्याली असेन ?

'पोरं' खोटी सांगताना मी
पाढा चुकली असेन? कि
अनुदान लाटताना मी
'पोषण आहार 'खाल्ला असेन ?
तुम्हाला काय वाटतं मी,काय प्याली असेन?

बंगले बांधताना मी
सिमेंट वापरलं असेल ?कि
झोपडीत तेल सुद्धा मी
त्यावर ओतलं असेल !
तुम्हाला काय वाटतं मी ,काय प्याली असेन?

धडे 'आदर्शाचे 'गिरवून मी
आदर्श झाली असेन ?कि
'खुदाईत' धन ओतून
त्याचा पाया भरला असेन?
तुम्हाला काय वाटतं मी,काय प्याली असेन?

या पायरीवर प्रत्येकाला ही
नशा चढली असेल ?
वाटून घेऊ आपण सारे जर
तुम्हाला हवी असेल !
तुम्हाला काय वाटतं मी ,काय प्याली असेन?
ज्याची मला इतकी ही नशा चढली असेल ?

No comments:

Post a Comment