अवचित... अनामिक... अचानक... अनाहूत....काहीतरी घडून जाते....
ते जे घडते... सगळे काही ढवळून निघते.... वादळाने सारे काही क्षणात उडुनी जाते....
उरते फक्त एक आर्त भावना.. ती पण शुष्क... तिचे ते प्रतिबिंब न्याहाळत शरीरामध्ये उरलेल्या अस्थींना घेऊन जातो नदीकाठी....
पंचमहाभूतांत विलीन झालेला देह, विसर्जित अस्थी... अधांतरी तरंगत असतो फक्त आत्मा... शोधात तिच्या भटकलेला.. अनंतात विलीन होऊ पाहणाऱ्या प्राणज्योतीला तिच्यातच एकरूप करू पाहणारा....
No comments:
Post a Comment