Sunday, October 30, 2011

यावे तुझ्या मिठीत... विसरून सारे जग....

यावे तुझ्या मिठीत...
विसरून सारे जग....
साम्वाशील जेव्हा मिठीत माझ्या तेव्हा...
एकदा हृदयात वाकून बघ..



लाजलीस ती कि...
चुकतो ठोका हृदयाचा ...
पळत येऊन मिठीत माझ्या...
घेतेस जेव्हा ठाव मनाचा...


पावसात तुझ्या भिजायला
मलाही खूप आवडतं
तू नसलास कि मात्र
एकटं एकटं वाटतं...

प्रत्येक सरीला तुझ्या
बिलगावं असं वाटतं
कानात येऊन कांही
सांगावसं वाटतं !

सरींचं पण थोडं
कधी ऐकावस वाटतं
भिजताना सोबतीला
तुला बोलवावसं वाटतं !

मनातलं.... मनाला
समजावं असं वाटतं
त्यासाठीच पावसात तुझ्या
भिजावं असं वाटतं !!!

No comments:

Post a Comment