ती म्हणाली काल | जेव्हा तू येशील |
मलाही नेशील | संगतीने ||
खुळ्यावानी रोज | तुला मी जपते |
परी हरवते | आस माझी ||
तुझ्यासाठी सख्या | रडते छकुली |
पाहते वाटुली |निरागस ||
पुरे झाले आता | आम्हाला छळणे |
व्हावे आता येणे | लवकरी ||
छळतो सखे ग | मलाही दुरावा ||
वाटे संपवावा | आता वेगी ||
असेच उडोनी |वाटे आता यावे |
आणि विसावावे | मिठीमध्ये ||
परी नाही रजा | देतसे साहेब |
विचारितो जाब | सदाकदा ||
काळीज हलले | मन गलबले |
डोळेही भिजले | आसवात ||
जगण्याची आता | आशाही संपली |
अशी 'ती म्हणाली | काल जेव्हा '||
No comments:
Post a Comment