Friday, October 14, 2011

मिठीत मी अन तू... विसरून जाऊ स्वतःला...

मिठीत मी अन तू...
विसरून जाऊ स्वतःला...
जग माझे मिठीत तुझ्या...
अन तूझे विचार तुझ्या मनाला...



गजरा जळून गेला.....

तो चेहरा तेथे हलकेच वळून गेला
मैफिलीत त्या नजरा खिळून गेला

बदलत्या स्पंदनांचा अहवाल काय देऊ
हातातला सुंगंधी गजरा जळून गेला

त्या मृग नयनी काजळात कैफ होती
काळजात भोळ्या,प्राण तळमळून गेला

चालता ऐसी,कटेवर नदी वळून जावी
भिजल्या जख्मांचा पहा बहर झडून गेला

भिरभिरत्या पापण्या स्पर्शत्या दिशांना
शब्द स्वातंत्र्य मागणारा ओठात जळून गेला

चांदनित गुंतल्या मना,आकाश ठेंगणे होते
हिरमुसला चंद्र तो, पहा क्षणात ढळून गेला

हृदयात ठासून चित्र ते झिंगतो मी निजेत
सत्यातल्या नशेचा शीण स्वप्नात पळून गेला

No comments:

Post a Comment