चंद्राचे काम छळण्याचे
तुझी आठव देवून
चांदण्या सवे सख्ये
ह्या पामराची मजा पाहण्याचे
छंद जडवा तुज
नसे नवे त्यात काही
निरखुनि पहा रातीचा अस्मान
ते चंद्र तारे तुलाच पाही
तेच हास्य माझ
काळीज चिरत
चंद्र तो भोळाभाबडा त्याची
नजर तुलाच शोधात फिरते
किती ना रे खोल
या सागराचा तळ
त्याला मी म्हंटल ,
तू हो ना थोडा उथळ !
टाकून तुझ्यात गळ मला
पाहायचाय तुझं मन .
दडी मारून बसलंय,
त्याच्यात माझही मन !
पाहू दे रे भरतीत मला
तुझं माझ्यावरचं प्रेम ;
ओहोटीवेळी पाझरणारे
ते डोळ्यातील थेंब !
घेऊ दे रे खारट तुझ्या
मला आसवांची चव ;
त्यातूनच कळेल मला
तुझी माझ्याकडची ओढ !
करू दे ना भावनांची
तुझ्या मला सफर ;
आठवण ठेवीन त्याची मी
प्रहर आणि प्रहर !!!!!!!!!!!
No comments:
Post a Comment