Monday, October 31, 2011

का रे असा करतोस... हृदय तोडतोस माझं..

का रे असा करतोस...
हृदय तोडतोस माझं....
मी पण तुझ्या साठी....
पुन्हा हृदय जोडते माझं...


नकळत तुझ्या माझ्या.
हृदय आपले जुंपले होते...
माझ्याच हातावर ते...
काचे सारखे तुटले होते...



हृदय माझे तुझ्यापाशी....
धडधड मात्र छातीत माझ्या...
तुटेल का गं तुझ्याकडून...
हीच एक खंत मनात माझ्या...



पाहशील का ग वळून....
चारचौघात तू असताना....
मन मोकळे बोलशील का ..
कुणी सोबत नसताना




हृदय माझे तुटले तेव्हा...
तुझे हृदय तुला हसवत होते...
पण सत्य तर हे आहे कि...
तेव्हा तुझे हृदय तुलाच फसवत होते..




आज माझे हृदय तुटले तरी..
मन मोकळे आहे..
मी एकटा असलो तरी..
सोबत तुम्ही सगळे आहेत...



आभाळ रडताना तुझी याद येते
डोळे बरसताना तुझी याद येते
पक्षी पाहुनी घरट्यात तुझी याद येते
आठवे उधळली कि तुझी याद येते



सुंदरते वर तुझ्या मज प्रिये
स्वतास आवरू शकलो नाही
चंद्रावर पण डाग आहे प्रिये
जाणून त्यास पाहणे सोडत नाही




तुला लिहिलेले प्रेम पत्र...
अजुन ही माझ्या उश्याशी...
आता मी त्याच्याशीच बोलतो...
जे बोलयचे होते तुझ्याशी

No comments:

Post a Comment