Sunday, October 30, 2011

मी खरंच प्रेमात पडलो काय..?

तुला पाहून मी..
तुझ्या भ्रमात पडलो काय....?
असा काय होतंय मला...
मी खरंच प्रेमात पडलो काय..?



जगण्याची हाव
काही सुटत नाही
असेल जरी किती यातना
यमास सामोरी पाहवत नाही




जगणे तिचे आज जड झाले
वासनेस शरीर तिचे बळी पडले
इच्छा मरणाची हाक आज हि ती देते
ते मात्र सात वर्षाच्या वनवासातून सुटले




शरीराची लक्तरे तोडताना
लांडग्यांनी हि लाजावं
मनुष्य वेशातील त्या
नरधामान अस का माजव ?

No comments:

Post a Comment