एक झाड वर होते एक घरटे
चिमणा चिमणी चे संसार तिथे थाटाचे
आम्ही दोन आमचे दोन अशी छोटी सी दुनिया
नजर लागण्या जोगी होत्या त्या चिमण्या
किती गोड होती त्यांची कहाणी
सुखी संसाराचे ते राजा राणी
.
.
पण कधी कुणाला कुणाचा सुख बघून होतो
देवाला सुधा तेव्हाच कोप येतो
हसणाऱ्या डोळ्यात आसवांचे ढग
त्या पाखरांच्या नशिबी काय
कुणाला त्याची उमग
.
.
वादळ कधी सांगून येत नाही
चाहूल दुखाची कधी होऊ देते नाही
मग कस सगळेच आधी सावरायचं
मोडताना घरटा हि बघावा लागत
क्षण क्षण आयुष्याच वेचाव लागत
.
.
मनाच्या कोपऱ्यात ज्यांना जपली जिवापलीकडे
तेच एक दिवस एकटे सोडून जातात
.
.
चिमणी पडली एकटी चिमणा गेला तिला सोडून
शिकाऱ्या ने घातली नजर आणि संसार दिला उधळून
मग ओउढे चिमणी लागली सगळ सावरायला
आपल्या लेकराचा काळजीत क्षण लागली घालवायला
पण नसीब कधी कुणास उमगले
त्या पिल्याच्या नशिबी होते पोरके होणे लिहले
.
.
उठत पळत उडत कशी तरी घरट्या ती पाहुचली
चोची आणलेला कवड प्रेमाने लेकरांना भरवली
डोळ्यात पाणी उरी वेदना
साभाळून हि श्वास आवरेना
यामला करत होती शब्दा शब्दात विनवनी
पण काही सार्थक नाही झाले
देह पडले , पंख पसरले,
पापण्या झापन्या आधीच
श्वासाने साथ सोडले
करून देवाच्या पदरी
ती चिमणी हि त्यना सोडून गेली..
.
.
झाड हे बघून फार दुखी झाला
त्याच्या घरट्याला त्याने आश्रय दिला
त्याच्या समक्ष हसता खेळता गोजिरवाणा संसार उध्वस्त झाला.......
.
.
शेवट कधी कुणी बघितल
जागून घ्या हे क्षण आज च
उद्या से घटका कोणी मोजल्या.......
No comments:
Post a Comment