Wednesday, October 19, 2011

तू अशी हसलीस कि

पुन्हा पुन्हा भेटण्याची
इच्छा मलाही होते
आठवणींच्या गावात
एक फेरी माझीही होते



तू अशी हसलीस कि सखे
काळजाचा एक ठोका चुकतो
सावरण्याचा करतो प्रयत्न ...
तुला पाहण्याचा मोका हुकतो....



मावळतीचा सूर्यही
जेव्हा प्रेमरंगी रंगतो
नाद तुझ्या आठवांचा
हळूच कानी गुंजतो

No comments:

Post a Comment