Monday, October 31, 2011

वारयाची येणारी प्रत्येक झुळूक

तू माझ्याशी कधीच बोलत नाहीस..
माझ्या कविताच तुझ्याशी बोलतात
ओठात अडकलेले शब्द तुझे मग
पापण्या हिसकावून सांगतात....

वारयाची येणारी प्रत्येक झुळूक
तुझ्या सुगंधाने दरवळते
मन माझे मग होई दिवाने
तुझ्या भेटीसाठी आतुरते....

तुझ्या आठवणींच्या सोबतीनेच
माझा काव्य प्रवास सुरु होतो ..
माझ्याही नकळत फक्त तुझ्यासाठी
मी कवितांच्या गावी जातो ...

तू सोबत नसतानाच नेमक्या
तुझ्या आठवणी स्मरू लागतात
होठ मुके मुके होतात
आणि शब्द कविता करू लागतात ...

आयुष्याच्या या वळणावरती मला तुझी साथ मिळेल का
माझ तुझ्या वर प्रेम आहे तुला कधी ते कळेल का??????

No comments:

Post a Comment