Sunday, October 30, 2011

रोज मीच तुझी आठवण काढायचं

रोज मीच तुझी आठवण काढायचं
तू मात्र सर्रास मज विसरायचं
स्वहून तुझ्याशी बोलायला यायचं
तू मात्र सतत टाळायच
या डोळ्यांना फक्त तुलाच पहायचं
पण तू मात्र नेहमीच दुर्लक्षित करायचं
का अस करतोस का अस वागतोस
आवडत तुला म्हणून मला छळतोस
किती ते तुझ्या मागे मागे करायचं
दुरूनच तुझ्यासाठी झुरायचं
एखादया दिवशी मीही रुसेन
देशील तू आवाज पण
साद द्यायला मी नसेन
शोधशील जरी कुठे मला
दिसेल फक्त ती निजलेली शय्या तुला
छळ मग किती
छळायच तेवढ
जमणार नाही तुला
प्रेम केल मी जेवढ .........

No comments:

Post a Comment