भूक लागली म्हणून हाताने
ताटातला घास घ्यावा ,
तोंडापर्यंत न्यावा ..आणि
तेंव्हाच त्या घासाने तोंडाला सांगाव...
..हिची भूक हि नाहीय..
तिला काय हवंय,
ते तिच्या डोळ्यांना विचार .
कुणासाठी वाहताहेत ,
ते त्या अश्रूंना विचार !
वाट पाहताहेत कुणाची ,
ते त्या थांबलेल्या
श्वासांना विचार....
कुणी ठेवलंय उनात
ते त्या कोमेजलेल्या मनाला विचार!
उत्तर मिळालं कि मला सांग,
म्हणाला तो घास .
आणि मग त्यानेही
रोखून ठेवला ...
ताटातला तो श्वास !!!!!
No comments:
Post a Comment