सांग तू अशी कोणी असेल का?
माझ्या आयुष्याच्या नवीन वळणावर,
सहज माझा हाथ विश्वासाने पकडणारी,
...
सांग तू अशी कोणी असेल का?
माझ्या जीवनाच्या काटेरी रस्त्यावर,
आयु ष्यात प्रेमाचे फुल पडणारी
सांग तू अशी कोणी असेल का?
मी पावसात भिजताना,
पावसात पण माझे अश्रू पाहणारी,
सांग तू अशी कोणी असेल का?
माझ्या डोळ्यात पाहून ,
माझे निर्मल अन्तः करण ओळखणारी,
सांग तू अशी कोणी असेल का?
माझ्यातला मी शोधून देणारी,
आणि माझ सर्वस्व विश्व होणारी,
सांग तू अशी कोणी असेल का?
कळत नकळत झालेली माझी चूक,
हक्काने सांगून ती सुध्रावणारी,
सांग तू अशी कोणी असेल का?
मी कधी रडत असताना ,
बेशक स्वतः चा खांदा भिजवणारी,
सांग तू अशी कोणी असेल का?
आणि आणि मला माझ्या
ह्या स्वप्नातून सहज उठवणारी,
सांग तू अशी कोणी असेल का?
No comments:
Post a Comment