Monday, October 10, 2011

प्रेम,

प्रेम,
याचा अर्थ आज वेगळाच लावला जातो
सखीला जो काखेत घेऊन फिरे
तो तिचा छावा म्हणवला जातो...!
माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणे
आणि वन फोर थ्री असे लेबल लावतात
चार दिवस मजा करून
नंतर त्यांनाच आय हेट यु म्हणतात...!
प्रेम,
आज फक्त गर्लफ्रेंड असणे एवढेच उरले आहे
मनात एक असताना
अन दुसरीच्या देहावर डोळा आहे...!!
प्रेम,
तिच्या आणि त्याच्या भावनांचा आदर असणे
एकमेकांना जपणे...
विश्वास आणि प्रामाणिकपणे वागणे..
एकाला दुःख झाले तर दुसऱ्याने आपसूकच रडणे
एक हसला तर दुसऱ्याने आनंदी होणे..
कदाचित, हेच प्रेम असणे....!!

No comments:

Post a Comment