Monday, October 10, 2011

पाहून मज उदास

पाहून मज उदास तो
फक्त स्वच्छ मनाने हसला
धुके सारून वाटेवरचे
मज नवीन मार्ग दिसला...
क्षणात मी मांडले
गणित त्या वाटेवरचे
उलगडल्या पायऱ्या त्याने
नियतीचे प्रमेय घेतले...
चुकत जाईन मी
वाट जिथे मिळेल
शिकत जाईन मी
नवीन जे जे कळेल ...
रात्र सरून पहाट
हा खेळ प्रत्येक वाटेचा
हृदयात सूर्य असता
नव प्रकाश तो चेतनेचा...
चालतो मी वाट माझी
कधीच न थांबण्यासाठी
शोधतात पाय माझे
नवीन वाट जगण्याची...

No comments:

Post a Comment