आठवायच्या आठवणी...
साठवायच्या साठवणी...
आठवणी अन साठवणी ...
यात गुंतले कि खुपतात मनी...
तू जे दिलेस मजला
ते तुलाही नकळत होते
पण मला जे मिळाले
ते स्वप्नांपलीकडे होते !
मी फक्त मागितले होते.....
नाते या जन्माचे ....
तूच जाता जाता दिलेस.....
वचन पुढल्या जन्माचे...
असे का होते
प्रत्येक हसण्या मागे एक दुख का लपते
येणारे सुख का अश्रू देऊन जातात
स्वप्नात असलेले का वास्तव्यात होते नाही
असे का होते काहीच कळत नाही
No comments:
Post a Comment