सांज जाहली सख्या, आठव आली
का कोण जाणे पण , आज नजर जागली?
दुपार सरली ,तिला नीज आली
का कशी तरी ,अजून उन्ह थांबली ?
सर आली,तीही चिंब जाहली
तरी कशी मनात ,एक तहान राहिली ?
मेहंदी रंगली,ती लाजून खुलली
का तरीही मग ती, अशी रुसून राहिली ?
कळी फुलली, रंगीत फूल जाहली
का तरी गंधात ती , अशी लपून राहिली ?
मने जुळली ,जुळुनी साथ चालली
तरीही का मग ती अशी , अबोल राहिली?
No comments:
Post a Comment