Friday, October 14, 2011

भेट क्षणांचीच खरी ओढ चिरंतन राही

भेट क्षणांचीच खरी
ओढ चिरंतन राही
क्षणभराच्या भेटीची
किनाराही वाट पाही

किनाऱ्याची ओढ अशी
बेभान सखे लाट होई
येई वेगे वेगे अशी
अन फक्त गळाभेट होई

सोडून देता लाटांना
किनाऱ्याचे राही काय
किनारा सुटता असा
लाटांना फुटती पाय

सुक्या किनाऱ्याचे प्रेम
ओल्या वाळूतून पाझरे
हर्ष होता भेटीचा असा
किनाऱ्याला फुटती झरे

No comments:

Post a Comment