Friday, October 14, 2011

जन्माला आली तरी स्वागत होत नाही,

जन्माला आली तरी स्वागत होत नाही,
कन्या आहे म्हणून आनंद होत नाही,

परक्याचे धन म्हणून पिता उदास होई,
वंशाचा दिवा नाही म्हणून आई उदास होई,

शिकून यमुनेची निर्मलता गंगेची धार होते,
कमावती म्हणून घराचा आधार होते,

लग्नाच्या बाजारात उभे राहावे लागते,
कन्या आहे म्हणून टोमणे सहन करावे लागते,

आई वडिलांना होते लग्नाची घाई,
सतत वर पक्ष विचारतो लग्न करता का ताई??

पसंत केले जाते ती शिकली म्हणून,
तरी हुंडा मागणी होते वर पक्षाकडून,

लग्न होई थाटात , येते सासरी हसत ,
पैशासाठी मात्र छळली जाते सतत,

एके दिवस जीवनाला ती खूप कंटाळते,
जीवन संपवण्यासाठी मृत्यला कवटाळते ,

अशी हि व्यथा आहे भारत्देशातील कन्येंची,
तरीही बदलत नाही विचारधारा समाजाची ..................

No comments:

Post a Comment