Friday, October 14, 2011

आंबेगाव तालुक्यात महाळुंगे नंबर १ आहे ;

आंबेगाव तालुक्यात महाळुंगे नंबर १ आहे ;

भीमाशंकर च्या पुण्य भूमीत, सह्याद्री च्या कुशीत,
लेण्याद्री,शिवनेरी ओझर च्या शेजारी,
पुणे जिल्यात एका हुतात्म्याचे गाव आहे ,
गावचे नाव भले "महाळुंगे पडवळ" असु दे,पण ,
" महाराष्ट्र " राज्यात प्रसिद्ध ओळख आहे.
हुतात्मा बाबु गेनू सैद याच गावचे सुपुत्र आहेत ,
१२ डिसेंबर हुतात्मा बाबु गेनू यांचा पुण्यतिथि दिवस आहे .
गांधी टोपी या गावात प्रसिद्ध आहे ,,
.२० वाड्या वस्त्यांचा असा हा गाव आहे ,,.
५ दुध डेअरी ,८ केश कर्तनालय ,६ हुंडेकरी .
३ ट्रान्स पोर्ट ,३ मराठी शाळा ,२ सोसायटी .
ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय ,बँक, गावात आहेत .
डिंभे कॅनॉल ने सारा गाव हिरवा गार दिसत आहे
मुंबईकर ,पुणेकर गावच्या महान व्यक्ति आहेत
गावची वेस,सभा मंडप,भली मोठी मंदिरे गावची शान आहे,
बाबु गेनू हायस्कूल आमची मान आहे.
बैल पोळा गावचा सन खास आहे ,
दत्त मंदीर,शिवाई मंदिर आमची आस आहे..
"दहितुले ची ’ मिसळ "लोखंडे "आवटे ,,ची भेळ . ,
"शिवाजी " वडापाव प्रसिद्ध आहे.
साहेब, दादा ,आण्णा यांचे आशीर्वाद आम्हास लाभले आहेत ,
म्हणूनच तर "महाळुंगे पडवळ" आमचा खास आहे..
यालाच २ रे नाव हुतात्मा बाबू गेनू नगर आहे ,
म्हणूनच आंबेगाव तालुक्यात महाळुंगे नंबर १ आहे ;
गर्व आहे मी "महाळुंगे कर" असल्याचा.
आमोल घायाळ

No comments:

Post a Comment