Friday, October 14, 2011

ती "टाटा" म्हणून जाते .

प्रेम हि एक भावना आहे
एक मनाची संवेदना आहे
केली तर खूप जिव्हाळ्याची
नाहीतर फक्त एक कल्पना आहे ...........



ती "टाटा" म्हणून जाते ................

मी म्हणता तिला गुलाब,ती मज काटा म्हणून जाते
मी नित करता 'हाय' 'हलो',ती मज टाटा म्हणून जाते

रचतो कविता,चारोळ्या,रंगवतो प्रेम चित्र नव नवे
वाचतो जेव्हा पुढ्यात तिच्या,ती बोभाटा करून जाते

उसने दे म्हणालो प्रेम काही,जीवन सार्थकी लागेल माझे
खऱ्या मागणीस माझ्या,ती नेहमी खोटा म्हणून जाते

रात्रीत भेटते ती,रोज नवी,गाते बिते,निवांत बोलणे होते
मी नीज खर्चुनी,ती स्वप्नातही तिचा वाटा मागून जाते

अजुनी आशेत मी,तो गुलाब,माझ्या बागेत रोवण्यासाठी
हृदय गुंतवणुकीस माझ्या,ती स्पष्ट तोटा म्हणून जाते

No comments:

Post a Comment