एक कविता लिहीन म्हणतोय...
आपल्या या नात्याला जोडायला...
शब्दच आता मला म्हणतात...चल जाऊ,
पुन्हा आमच्या राज्यात कविता करायला...
कवेत तुला घेताना...
सुचली एक कविता...
ओठावरच्या शब्दाला तुझ्या...
टिपले मी तुला न सांगता...
तुझ्या कवेतल्या कविता...
कवेत तुझ्या विरून गेल्या ...
मी पाहत बसलो तुला अन...
साऱ्या आठवणी भर दिवसा येऊन गेल्या..
मिठीतला मी तुझ्या..
तुझ्यात विरून जायचो...
तू अजून घट्ट मिठी मारलीस कि...
मी मलाच विसरून जायचो...
तुझ्या मिठीत आल्यावर....
सर जगच तिथे भासायचं...
तू मिठीत आलीस कि...
सार आभाळ मनात दाटायाचं ...
आज तुझ्या मिठीतच...
मला बिलगून राहू दे...
साऱ्या जगाला आज..
मला विसरून जाऊ दे...
No comments:
Post a Comment