कुंपण खातंय जगात आज राजरोसपणे शेत
आजकाल प्रेमात आणि सत्तेत सगळंच माफ,
प्रेयसीने केला घात आणि बाईंनी दिली लाथ
पानिपतातले विश्वासराव पुनच्छ एकदा साफ..!!
अंत ना चुकला कुणाला
तरी जगण्यासाठी धडपडला
त्या धडपडीचा सख्ये
जरा लवकरच शेवट झाला
समाजाच्या वेशीवर
इज्जतीची लक्तरे मांडली
पाषाणाने हि त्यासाठी
थोडीशी असावे वाहिली
चार इंचाच्या पोटासाठी
तिन आपल इमान इकल
अन क्षणीक भोगासाठी
त्यान ते इकत घेतलं
तिच्या भोवताली
पाश वासनाचा
जंगलाच्या कायद्यात
जय जयकार लांडग्याचा
No comments:
Post a Comment