Sunday, October 9, 2011

तुझ्या माझ्या आठणींना.. आता उरली नाही सीमा..

तुला मला सोबतीला...
आहे भास आपलाच..
क्षण हे वैराचे...
त्यांना ध्यास आपलाच...

मी एक किनारा...
तू वाहती लाट...
क्षण हे वैराचे...
बघ करुन बसलेत थाट...

तु तिथे मी इथे...
स्वप्नात गुंतलेले..
क्षण हे वैराचे...
कसे आहेत मंतरलेले..

तुझ्या माझ्या आठणींना..
आता उरली नाही सीमा..
क्षण हे वैराचे...
लादतात विरहाची परीसीमा..

No comments:

Post a Comment