मी एक वेडा
अन हे जग शहाण्यांचे
डोहाळे मज लागले होते
त्या वांझोट्या गुन्ह्यांचे...
नग्न प्रेमाची मी
फाडली खोटी वस्त्रे
नग्न होऊनी मी स्वतः
डागतो हि शब्दास्त्रे ..
भिकार ती नाती मी
तुडवीत गेलो पायदळी
विसर्जित केली कुजलेल्या
त्या भावनांची राखरांगोळी ...
गांडुळे ती समाजातली
शोषून रक्त जगतात
रक्त भिनते भरारीचे तिथे
मज बांडगुळ होण्यास सांगतात...
गवसेल मज आकाश
मी सोडीन धोपट वाट
मुक्त मी जागून दाखवीन
ह्या करंट्या समाजात....
वेडा होऊन जगताना
मज शहाणे व्हायचे कळले
हौस ती मज जगण्याची
जिथे अनेक धुरंदर जळले...
No comments:
Post a Comment