डोळ्यातील भाव जाणुनी
मनात उतरवतो
मन हे वेडे सख्ये तेच
भाव लेखणीत मांडतो
पावसाला पण फसवायची सये
मी अवगत केली आहे कला
तू भिजू नये सामोरी माझ्या
नयनात साठवले आहे त्याला
उरफाटं तत्वज्ञान
टाहो सत्याचा
घूमा कालायुगकाल
माणुसकीच्या हत्येचा....
ka aajkal diwas
kantalvane jhalet
man kitihi ramvnyach mhantl
tari sagal kas nisthabd jhalet ...........
वेदनेच्या प्रहरी
तिन्हीसांज ती रडली
तिच्या विरह मार्गावर
रात्र माझी कोमेजली
भूतकाळाचा जो तुकडा
असह्य होऊन गळाला
भविष्यात मज तो
अश्रू रूपाने मिळाला
ओलांडण्या उंबरठे पापण्यांचे सये
कारणे भोवताली पाहू लागले
विरहाचा सागर दिसता सामोरी
आसवे दुधडी भरून वाहू लागले
एकदा प्रश्न केला आसवाने सये
मी नेहमी का रडताना बाहेर पडतो
मी म्हटलं शिंपल्यात नाही रे किमत
बाहेर आल्यावर तो मोती आहे हे कळतो ?
जेव्हा तिला फोन केल्यावर
कोण बोलतंय..? असे उत्तर मिळाले...
आपण पोरका झालो
मला तेव्हा कळाले
कोणाची वेदना मोठी
ह्यात एकदा स्पर्धा झाली
मी जिंकलो कारण
एकटेच जगण्याची पाळी आली...
No comments:
Post a Comment