Sunday, October 9, 2011

सांजवेळी सोबतीला सखे तुझी आठवण

मनामनातून गुंफले होते स्वप्नांचेच धागे
एक पवित्र नाते जुळले होते शब्दांच्याच मागे ,
प्रेमसागरतीरी मी एक स्वप्नील दुनियाच साकारली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली .....



सांजवेळी सोबतीला
सांजवेळी सोबतीला
सखे तुझी आठवण
लोचनांत आसवांची
होते मग साठवण

सांजवेळी सोबतीला
सखे भास स्पर्शातले
पाहशील कधी प्रिये
भाव माझ्या डोळ्यातले

सांजवेळी सोबतीला
आठवांची होई दाटी
नको असा सूड घेऊ
किती धावू तुझ्यापाठी

सांजवेळी सोबतीला
सखे तुझी वाट आहे
ये न आता लवकरी
चढायचा घाट आहे

No comments:

Post a Comment