Monday, October 10, 2011

एक मिठी.. तुझ्याचसाठी रिकामी..

एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..

एक जीव..
तडफडणारा..
असहाय्य..
तुझ्याविना..
तुझ्याचसाठी....

एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,....

No comments:

Post a Comment