Monday, October 10, 2011

तुला पाहताना देहभान विसरुन गेलो...

सांगायचे होते ते सांगायचे राहून गेले.
जगायचे होते तुझ्या सवे काही क्षण ते जगायचे राहून गेले..
मी पाहत होतो वाट तुझ्या शब्दांची...
अन मला जे बोलायचे होते तेच राहून गेले...


मी एक दवबिंदू अळवावरचा..
काही काळ माझं अस्तित्व...
जराशी वारयाची झूळूक येता...
पडून विरुन जाईन मी या मातीत...



तुला पाहताना देहभान विसरुन गेलो...
मी माझा न राहून तुझ्यात विरुन गेलो..
तु मात्र हसत होतिस माझ्या असण्यावर...
अन मी नकळत तुझ्या हृदयात राहून आलो..



अडगळीच्या खोली मधलं.
दप्तर अजूनही जेव्हा दिसतं.
मन पुन्हा लहान होऊन...
हळूच बाकावर जाउन बसतं



पावसाळी ती संध्याकाळ...
रिम झिम पाऊस बरसत होता...
तुझ्या सोबत भिजायला...
जसा पाऊसही तरसत होता..


तु गेल्यावर नजर...
तुझी वाट निहारत असते...
जाता जाता एकदा तू..
वळून पाहतोस का बघते.




मी लिहितो खुप काही..
पण ओठावर काहीच येत नाही...
तुला कळावे माझे हे शब्द...
या शिवाय काहीच मी मागत नाही..

No comments:

Post a Comment