Wednesday, November 2, 2011

काल एक फुलांचं जंगल पाहायला मिळाल,

काल एक फुलांचं जंगल पाहायला मिळाल,
खूप होती त्यात फुलं...
पाहिलेली,न पाहिलेली ,ओळखीची
तर कांही अनोळखी पण होती त्यात...

कांही रंगीत ,कांही गंधित..
ती त्यांच्याच नादात डुलत होती ...
तर कांही पांढरीच पण थोडी मस्तीत
खूपच सज्जन समजत होती....
तशीच कांही जगत होती
आपलं शापित आयुष्य ...
कांही होती खास सत्कारासाठी
गळ्यात कुणाच्या तरी हात टाकण्यासाठी .....
कांहींचा जन्मच पायी वाहण्यासाठी ,
निर्माल्य होवून संपण्यासाठी .......
तर कांहींना वेगळंच ठेवलं होतं...
फक्त श्रद्धांजलीसाठी !
कांहीना आवड मिरवायची ,
म्हणून मग ती शोभली वेणीसाठी ....
कांहींना वाटतं आपण समोर असावं ,
ती मग फुलदाणीत ..गंध आणि शोभेसाठी ....
कांही अशीच होती माळावरची,
उनाला सोबत करण्यासाठी ......
तर कांही कडेंला उगवलेली,
रस्त्याला एकटं न सोडण्यासाठी .......
कांही बोडक्या डोंगरावर,
कुणाची तर वाट बघण्यासाठी ......
तर कांही शांत ,निरागस ,अबोल
जे दिसतंय ,ते फक्त ............ सामावून घेण्यासाठी !!!!!!!!!!!

No comments:

Post a Comment