Tuesday, November 8, 2011

मन पाखरू पाखरू

मन पाखरू पाखरू ................
====================================

पिंजर्यात कैद पक्ष्या प्रमाणे आज हा का तडफडत आहे? कुणी तरी श्वास रोखल्या सारखा का भासत आहे? परत परत त्याच्या विचारांच्या ओघात वाहत आहे. का ???
.
.
......................

________ कल्पना होती आधीच... सगळे पोखळ आहे ते, काहीच नाही फक्त मनाची घुसमळ आहे हि . ...............................
"त्रास".... नाही त्रास होते नाही फक्त सत्य पचवायला जरा जास्त गोड आहे.
"वेदना"........ अजिबात नाही काटे आधी पण रुतले आहेत पण हे जरा बोथड आहेत.
"आठवण"...... जशे नक्षत्र बदलतात, ऋतू चक्र चालतो , समय सगळ वाहून नेतो.....................
..... फक्त हा पूर वाटत उशिरा ओझरणारा आहे
"नशीब"........ विश्वास बसला जेव्हा ती सावली दूर दूर जाऊ लागली,
.............माझी वाट, माझी वाट पाहू लागली .........
"साथ"...... सोबती, सवंगडी.____ एक स्वप्न तुटला, निद्रेच्या गावातून एकटाच परतला, हे तर होणारच होते .तारा जरी तुटला तरी अवकाश रिक्त होते नसते .... पण तुटताना मात्र तो सर्वांची इच्छा पूर करून जाते .......

"स्वप्न "..... होते एक__ आज हि आहे___ उद्या हि असणार__ श्वास आहे तो वर स्वप्न पापण्या भिजवणार ...............
"अश्रू"..........यांचा तर जन्मो जन्मीचा साथ आहे हेच तर, एक ब्रह्मांडात व्याप्त सत्य आहे

"प्रेम "...... उपाष्याला शिदोरी , उरी ढासली तरी नाही भूक भागली ....

"नाते "...... गुंफण आहे उगाच स्वतंत्र आयुष्याचा मरण आहे .वैराग्याला बघून वाटते चूक समीकरण आहे .
"मृत्यू "...... अंत अंत अंत पण फक्त देहाचा. जाणारा कधी हि एकटाच जातो आपल्या आठवणी का सोडून जातो .. जर मृतू अंत आहे तर सर्वस्व का संपत नाही .. आपले अंश का मागेच सोडून जातो .. मग हा अंत नसावाच ..
...........................परत वाहत गेला . कुठे तरी कधी तरी विसाव जरा .. चाराचारातून भ्रमण करून दमला असशील , क्षणभर क्षण साठी स्वतः चा पण विचार कराव जरा . का कुणा साठी एवडी धावपड.??????

No comments:

Post a Comment