Thursday, November 17, 2011

"माझ तुझ्यावर प्रेम आहे..."

तुझा रुसणे ....
खोटे खोटे रागावणे....
घायाळ करते हृदयाला....
तुझे ते खळखळून हसणे...



लटक्या रागाला तुझ्या.....
स्पर्श माझा पुरेसा असतो....
गळून पडतो तो हि....
जेव्हा मी सोबत असतो...



मी तुला पहिले...
अन मलाच विसरून गेलो.....
तुझ्या सोबतचे ते क्षण....
नेहमी जगत गेलो...




आवडते मला खूप..
तुझी वाट पाहत थांबायला....
तू जवळ नसतानाही...
तुझ्या आठवणीत रमायला...



"माझ तुझ्यावर प्रेम आहे..."
तू हळूच माझ्या कानात म्हटले होतेस....
माझे असलेले माझं हृदय तू
अलगद चोरून नेले होतेस..

No comments:

Post a Comment