Tuesday, November 8, 2011

चारोळ्याच्या विश्वात सु स्वागतम

सखे पेटते काळजात
आठवांचीच सांजवात
शब्दाशब्दांतून मांडतो
विरह काव्य मांडवात


तुझ्या नजरेचा तीर
गेला काळीज छेदून
शब्द मुरले ओठात
शांतीची झूल पांघरून ..



चला या विश्वात करू आपले स्वप्न साकार
कधी होकार तर कधी नकार
कधी शब्दावर होऊदे तकरार
शब्दांचे भांडण शब्दांची उधळण
भावना व्यक्त करण्या साठी करू
शब्दांची मंथन
चारोळ्याच्या विश्वात सु स्वागतम


मी तुला हवा तसा दिसेन पण
आरसा जरा स्वत:समोर धर

दु:ख फार तर असेल वीतभर
पाहिजे रुमाल मात्र हातभर.....




भक्ती शिवबाची भरली आहे तनामनात,
अर्पित त्याला धमन्यांतील रक्तही सळसळत,
भाग्योदय मराठी मातीचा त्याचं पावली
बघून निद्रिस्त मराठी बाणा हृदय कळवळत..!!





शब्द शब्द जपून बोल
सल जन्माची राहते
नको काटेरी ही वाट
वेदना अजुनी सलते




नेसुनिया साज नवा
रान वेळी हिरवीगार
हिरव्या रंगात नटुनी
माझं साजरं शिवार ...

No comments:

Post a Comment