Wednesday, November 9, 2011

आठवणींच्या हिंदोळ्यावर....

तुझ्या मिठीत विसावण्याचा
एक तरी अवसर दे
ह्या पृथ्वीतलावरच सख्ये
स्वर्गाचा उपभोग भोगू दे




पुरे कर आत्ता शृंगार
हा जीव आत्ता किती हरणार
पाहून तुज हे नयन हसणार
पण हे मन मात्र झुरतच राहणार


ह्या वेड्या मनाने आज
डोळ्यांना हि फितवले
का कुणास ठाऊक सख्ये
त्यांनी हि तुझ्यासाठी चार थेंब वाहिले



आठवणींच्या हिंदोळ्यावर....
पुन्हा मला झुलायच आहे ....
तुझ्या संगे पुन्हा एकदा...
आकाशाला गवसणी घालायची आहे...




हा पाश आठवणीचा
सुटता सुटत न्हवता
शेवटी थकून हा जीव
अंतरात विलीन झाला होता

No comments:

Post a Comment